Amravatiamravatinews

अमरावतीमध्ये भव्य रक्तदान शिबिर | ४८ रक्तदात्यांनी केले जीवनदान |

श्रीमती नरसम्मा महाविद्यालयात पार पडलेल्या या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ४८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. गडगे बाबा ब्लड बँकेचे डॉ. कविमंडल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वी झाले. या कार्यक्रमाला तरुण भारतचे संपादक प्रदीप कायदे, लायन्सचे झोन चेअरमन डॉ. राजेश चंदनपाट, लायन्स क्लब प्राइडचे अध्यक्ष प्रमेंद्रसिंह ठाकूर, मनीष टाले, सुरेश इंगळे, डॉ. राजेश भटकर, आशिष वाहणे, लिओ क्लबचे अध्यक्ष सुजल इंगळे, देवेंद्र ठाकूर, मोहन जाखड आणि महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी रक्तदान करणाऱ्यांचे कौतुक केले आणि इतरांनाही रक्तदान करण्याचे आवाहन केले.


Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button