AmravatiLatest News

अमरावती-दर्यापूर मार्गावर दर्यापूर आगाराची MH40 Y 5553 क्रमांकाची एसटी बस फेल.

अमरावती-दर्यापूर मार्गावर आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. दर्यापूर आगाराची एक एसटी बस अचानक रस्त्यात बंद पडली, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. जाणून घेऊया सविस्तर वृत्त…”

अमरावती-दर्यापूर राज्य महामार्गावर 1 फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता हर्षराज कॉलनीजवळ दर्यापूर आगाराची MH40 Y 5553 क्रमांकाची एसटी बस अचानक बंद पडली. प्राथमिक माहितीनुसार, बसचा एक्सल तुटल्याने हा प्रकार घडला.

या घटनेमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. बसमध्ये प्रवास करणाऱ्या ४० प्रवाशांना पर्यायी बसमध्ये हलविण्यात आले. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा जुन्या, भंगार बसमध्ये प्रवास करावा लागतो, असे सांगत संतप्त प्रवाशांनी परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.

“या घटनेनंतर प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या प्रशासनावर नाराजी व्यक्त केली असून, ग्रामीण भागात सुस्थितीत बसेस देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्युज

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button