Amaravti GraminLatest News

शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या पडला विहिरीत, वन विभागाने केले यशस्वी बचावकार्य

तिवसा :- “तिवसा तालुक्यात आज एक अजब नाट्य घडले. शिकारीच्या शोधात असलेला एक बिबट्या चक्क शेतातील विहिरीत पडला. या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले, मात्र वन विभागाच्या तत्परतेने या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. पाहूया आमचे प्रतिनिधी जयंत निखाडे यांची रिपोर्ट

तिवसा तालुक्यातील मोझरी लगत असलेल्या मालधुर येथील एका शेतशिवारात रविवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास एक बिबट्या शिकारीच्या शोधात असताना अचानक विहिरीत पडला. मजुरांना याची माहिती मिळताच ग्रामपंचायत सरपंच सुरेंद्र भिवगडे यांनी तातडीने वनविभागाला कळवले.

वन विभागाचे अधिकारी आणि तिवसा व चांदूररेल्वे वन परिक्षेत्रातील बचाव पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. विहिरीच्या काठाला बसलेल्या बिबट्याला वाचवण्यासाठी जाळी आणि पिंजऱ्याचा वापर करण्यात आला. काही वेळाच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात कैद करण्यात वन विभागाला यश आले.

गेल्या दोन आठवड्यांपासून शीरजगाव, अनकवाडी आणि मालधुर परिसरात बिबट्या दिसत असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे शेतकरी भीतीच्या छायेखाली होते. मात्र, आजच्या घटनांनंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

सदर बिबट्याची वनपरिक्षेत्र चांदूररेल्वे येथे नोंद घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला जंगलात सुरक्षित सोडण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.

“बिबट्याच्या या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या भीतीला विराम मिळाला आहे. वन विभागाने तातडीने केलेल्या कारवाईबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील काही दिवस वन विभागाने विशेष पथक तयार करून परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज” !

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button