AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

परतवाड्यात गोवंश वाहतुकीवर मोठी कारवाई! ९ जनावरांची सुटका; तीन आरोपी अटकेत

धारणी रोडवरील बुरडघाट बस स्टॉपजवळ परतवाडा पोलिसांचा सापळा; बोलेरोसह २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

अमरावती : कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरांची वाहतूक केली जात असल्याच्या संशयावरून अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. परतवाडा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने धारणी रोडवरील बुरडघाट बस स्टॉपजवळ सापळा रचून बोलेरो वाहन अडवले. या वाहनातून तब्बल ९ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर रोजी परतवाडा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, धारणी रोडमार्गे गोवंशीय जनावरांना कत्तलीच्या उद्देशाने करजगावच्या दिशेने नेले जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी बुरडघाट बस स्टॉपजवळ सापळा रचला.

पहाटे सुमारे ६ वाजताच्या सुमारास पांढऱ्या रंगाची बोलेरो त्या मार्गावरून येताना पोलिसांनी थांबवली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ९ गोवंशीय जनावरे दाटीवाटीने आणि छळ होईल अशा पद्धतीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली.

जनावरांच्या मालकीबाबत कोणतेही कागदपत्र सादर करण्यात आले नसल्याने पोलिसांनी कारवाई करत वाहनातील तीन संशयितांना ताब्यात घेतले.

तीन आरोपी अटकेत

या प्रकरणी पोलिसांनी सोहेल अहमद शकील अहमद, समीर खान अझीम खान आणि रिजवान अहमद शेख निसार यांना अटक केली आहे.

पोलिसांनी कारवाईदरम्यान ९ गोवंशीय जनावरे आणि अंदाजे २ लाख रुपये किमतीची बोलेरो असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गोवंश गोसेवा समितीकडे दाखल

सुटका करण्यात आलेल्या गोवंशीय जनावरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे अचलपूर येथील श्री सैतुतबाग हनुमान गोसेवा समितीकडे दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास परतवाडा पोलीस करत असून, गोवंशीय जनावरांची वाहतूक कोणत्या उद्देशाने आणि कुठे केली जात होती, याबाबतही तपास केला जात आहे.

अमरावती ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे गोवंश वाहतुकीविरोधातील पोलिसांची मोहीम पुन्हा अधोरेखित झाली असून, या प्रकरणातील पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button