citynewsLatest NewsMaharashtraVasaiWeather Report

वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार! अनेक भागांत गुडघाभर पाणी, वाहने पाण्यात अडकली

सकाळपासून जोरदार पावसाची संततधार; रस्ते जलमय, बस थांबाही पाण्याखाली गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

वसई-विरार | City News

वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार उडाला आहे. सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक वाहने पाण्यात अडकल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वसई-विरारमधील अनेक सखल भागांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेली अनेक वाहनेही पाण्यात अडकल्याचे दृश्य समोर आले आहे.

रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीवरही झाला आहे. काही मार्गांवर वाहनांची गती मंदावल्याने नागरिकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे महापालिकेचा बस थांबाही पाण्यात बुडाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. बसची वाट पाहणाऱ्या नागरिकांना पाण्यातूनच मार्ग काढण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. गणेशभक्त, वाहनचालक आणि प्रवाशांसमोर पाणी साचलेल्या रस्त्यांचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

मुसळधार पावसामुळे वसई-विरारमधील परिस्थिती चिंताजनक बनली असून, पावसाचा जोर कमी होतो की नागरिकांच्या अडचणी आणखी वाढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत राहा City News.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button