citynewsLatest NewsMaharashtraYavatmal

पुसदमध्ये गरजवंतांसोबत ‘मानवतेचे रक्षाबंधन’

वृद्धाश्रमातील वृद्ध, रुग्ण आणि गरजू नागरिकांसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण; कपडे, साडी-लुगडे आणि गोड जेवणाचे वाटप

यवतमाळ : रक्षाबंधनाचा सण म्हणजे प्रेम, आपुलकी आणि नात्यांचा उत्सव… मात्र याच सणाला माणुसकीची अनोखी जोड देण्याचा उपक्रम यवतमाळच्या पुसद येथे राबवण्यात आला. माणुसकीची भिंत सोशल फाऊंडेशनच्या वतीने ‘मानवतेचे रक्षाबंधन’ हा उपक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमांतर्गत वृद्धाश्रमातील वृद्ध, उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तसेच परिसरातील गरजू नागरिकांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.

गरजवंतांच्या हातावर बांधली राखी

रक्षाबंधनाच्या निमित्ताने उपस्थित गरजू नागरिकांच्या हातावर राखी बांधून त्यांना सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. रक्ताच्या नात्यांपलीकडे जाऊन माणुसकीचे नाते जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

गरजू महिलांना साडी-लुगडे, तर पुरुषांना टॉवेल, टोपी आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच उपस्थितांसाठी गोड जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली.

गरजवंतांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

सण-उत्सव केवळ आपल्या कुटुंबापुरते मर्यादित न ठेवता समाजातील गरजू आणि वंचित घटकांसोबत आनंद वाटून घ्यावा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

राखी बांधताना आणि भेटवस्तू स्वीकारताना गरजवंतांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हा या उपक्रमाचा सर्वात भावनिक क्षण ठरला. उपस्थित नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.

माणुसकीच्या नात्याचा सुंदर संदेश

रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला केवळ धार्मिक किंवा पारंपरिक सणाचे स्वरूप न राहता सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा स्पर्श मिळाला.

गरजूंच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्यासोबत सणाचा आनंद साजरा करण्याचा हा प्रयत्न समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचं नातं मोठं असतं, हा सुंदर संदेश ‘मानवतेचे रक्षाबंधन’ या उपक्रमातून पुसदकरांना मिळाला.

दुर्गेश कान्हु, सिटी न्यूज, यवतमाळ.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button