Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraWashim

क्षणात सर्व काही संपलं! भरधाव पिकअपने दुचाकीला चिरडलं; आईच्या डोळ्यासमोर २ मुली आणि नवऱ्याचा मृत्यू

वाशिममध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका कुटुंबावर काळाने घाला घातला. या भीषण अपघातात वडील आणि दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिममधील महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात आईसमोरच तिच्या दोन मुली आणि नवऱ्याने प्राण सोडल्याने हृदयद्रावक चित्र निर्माण झाले. गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे.

वडील आणि दोन निष्पाप मुलींच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button