Uncategorized

नळ कोरडे पण रस्त्यावर हजारो लिटर पाणी!

अमरावती शहरात पाणी टंचाईची ओरड असताना दुसरीकडे मात्र हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अमरावतीतील पन्नालाल नगर भागात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

“एका बाजूला नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे… आणि दुसऱ्या बाजूला पन्नालाल नगर परिसरात पाणी अक्षरशः रस्त्यावरून वाहत आहे.” “पनपालिया यांच्या घरासमोर पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, रस्त्यावरून वाहणाऱ्या या पाण्यामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे.” स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा जीवन प्राधिकरणाकडे तक्रार केली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.”

रस्ते ओले, नळ मात्र कोरडे!
जनतेची वाढती अडचण, प्रशासनाचे मौन!”
पन्नालाल नगरची हाक – आता तरी जागे व्हा सरकार!”

“या पाण्याच्या नासाडीमुळे एकीकडे जलसंकट अधिक गंभीर होत आहे, तर दुसरीकडे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.”
“स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे.”

“जर तुमच्या परिसरातही अशा प्रकारची समस्या असेल, तर आमच्याशी संपर्क साधा…
आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रशासनापर्यंत ही बाब पोहोचेल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button