Uncategorized

एक्टिवावरून दारू तस्करी करणारे 2 आरोपी अटक, पण मोठे मासे अजूनही मोकाट!

आयुक्तालय हद्दीत अवैध दारू तस्करीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे. मात्र या कारवाईमुळे एक गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे…
शहरात सुरू असलेल्या मोठ्या बूटलेगिंग रॅकेटवर नेमकी कधी कारवाई होणार?”

दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली… की एक इसम निळ्या रंगाच्या मोपेडवरून अवैध दारूची वाहतूक करत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली… यावेळी गौतम धाडसे याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्या ताब्यातून— तीन पेट्या बॉबी संत्रा देशी दारू, एक पेटी टॅंगो पंच देशी दारू
आणि एक बिना नंबरची एक्टिवा मोपेड असा एकूण 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान हा माल राम भगवानदास अहिरवार याचा असल्याचे समोर आले…
आणि त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी गाडगे नगर पोलीस ठाण्यात
महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

मात्र ही कारवाई फक्त सुरुवात आहे का… असा प्रश्न उपस्थित होतोय.”

“कारण शहरात अजूनही अनेक मोठे डीलर दररोज हजारो पेट्यांची अवैध दारू सप्लाय करत असल्याची चर्चा आहे. रात्रीच्या अंधारात खुलेआम होणारी ही तस्करी स्थानिक प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरत आहे. या संपूर्ण नेटवर्कचा उलगडा करून मोठ्या रॅकेटवर कारवाई करण्याची जनतेची मागणी आता जोर धरत आहे.”

छोट्या कारवाया होत आहेत… पण आता गरज आहे ती मोठ्या माफियांवर कडक कारवाईची.
पोलिसांचा पुढचा टार्गेट कोण…? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button