AmravaticitynewsCrime NewsLatest NewsLocal NewsMaharashtra

अमरावतीत फिल्मी स्टाईल पाठलाग! मंगरूळ दस्तगीर पोलिसांची धाडसी कारवाई — १२ गोवंशांची सुटका

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी मध्यरात्री फिल्मी स्टाईल पाठलाग करत अवैध गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावला आहे. या कारवाईत एका पिकअप वाहनातून क्रूरपणे नेल्या जात असलेल्या १२ गोवंशांची सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस पथक रात्री गस्तीवर असताना एक संशयास्पद पिकअप वाहन दिसले. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने वेग वाढवत पळ काढला. यानंतर पोलिसांनी तत्काळ त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला.

काही अंतरावर पोलिसांनी वाहनाला घेराव घालत ताब्यात घेतले. वाहनाची झडती घेतली असता, पिकअपमध्ये तब्बल १२ लहान-मोठे गोवंश अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबलेले असल्याचे आढळले. यात एका गोवंशाचा मृत्यू झाला होता, तर उर्वरित ११ गोवंश गंभीर अवस्थेत होते.

पोलिसांनी तातडीने सर्व गोवंशांची सुटका करून त्यांना धामणगाव येथील गौरक्षण केंद्रात सुरक्षित पोहोचवले. या धाडसी कारवाईमुळे मुक्या जनावरांना जीवदान मिळाले आहे.

ही कारवाई ठाणेदार शरद आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन लांडगे, सतीश ठवकर, गजानन डवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. परिसरात पोलिसांच्या या तत्परतेचे मोठे कौतुक होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी संबंधित पिकअप वाहन जप्त केले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे अवैध तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

📺 अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा — सिटी न्यूज

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button