Accident NewscitynewsLatest News
आंध्र प्रदेशात पोलिस ठाण्यात स्फोट; उपनिरीक्षकासह चार पोलीस जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

कृष्णा जिल्हा : आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील अवनिगड्डा उपविभागातील चल्लापल्ली पोलीस ठाण्यात मंगळवारी (31 मार्च 2026) झालेल्या स्फोटात उपनिरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जखमींमध्ये उपनिरीक्षक अंजनेयुलू, न्यायालयीन प्रकरणे पाहणारे कॉन्स्टेबल अब्दुल्ला, हेड कॉन्स्टेबल तेजा आणि पोलीस वाहन चालक नागराजू यांचा समावेश आहे.
स्फोटानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.



