Amaravti GramincitynewsLatest NewsMaharashtra

धारणी तालुक्यात भीषण अपघात; पिकअप उलटून दोन महिलांचा मृत्यू, ८-१० मजूर जखमी

धारणी : अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील लवादा गावाजवळ मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला असून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ८ ते १० मजूर गंभीर जखमी झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लवादा गावातील मजूर पिकअप वाहनातून कामासाठी जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहनाचा अपघात झाला. या भीषण अपघातात दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवण्यात आले आहे.

घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button