citynewsLatest NewsMaharashtra

ऑटो एलपीजी तुटवड्याची शक्यता; आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर पुरवठा अवलंबून – अशोक चव्हाण

मुंबई : माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी देशातील ऑटो एलपीजी गॅस तुटवड्याबाबत महत्त्वपूर्ण विधान करत आंतरराष्ट्रीय युद्धपरिस्थितीचा परिणाम भविष्यात गॅस पुरवठ्यावर होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

सध्या देशात ऑटो एलपीजीचा काही प्रमाणात साठा उपलब्ध असला तरी जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संघर्षामुळे पुढील काळात तुटवडा निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. गॅस आयातीसाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत असून, विशेषतः हॉर्मोज सामुद्रधुनीमार्गे आयात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच पंतप्रधान स्तरावर संबंधित देशांशी संवाद सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मात्र, आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी बदलते यावर भविष्यातील पुरवठा अवलंबून राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सरकार आवश्यक ती काळजी घेत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी अशोक खरात प्रकरण, गॅस KYC तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही प्रतिक्रिया दिली. विविध मुद्द्यांवर भाष्य करताना युद्धपरिस्थितीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button