Crime NewsLatest NewsPune

जुन्नरमध्ये महिलांची टोळी सक्रिय! २ लाखांचे ९० तांब्याचे हंडे चोरी प्रकरण उघड

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, आता महिलांच्या टोळ्याही गुन्हेगारीत सक्रिय झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. भांडी व्यवसायिकाच्या गोडाऊनमधून तब्बल २ लाख रुपये किमतीचे ९० तांब्याचे हंडे चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

महाजन आळी परिसरात राहणारे व्यापारी आनंद सासवडे यांच्या गोडाऊनचे शुक्रवारी रात्री कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तांब्याचे हंडे लंपास केले होते. विशेष म्हणजे, गोडाऊनमधील इतर महागड्या वस्तूंना हात न लावता केवळ तांब्याच्या हंड्यांवरच डल्ला मारण्यात आला होता, त्यामुळे ही चोरी सुरुवातीपासूनच संशयास्पद ठरली होती.

घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता काही महिला संशयास्पद हालचाली करताना दिसून आल्या. यानंतर सहाय्यक फौजदार दीपक साबळे यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पंचलिंग वस्ती परिसरात सापळा रचला.

या कारवाईत सारिका मकवाने, अंजली वाघमारे आणि सुरेखा वालेकर या तिघींना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले तांब्याचे हंडे आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

या घटनेमुळे जुन्नर परिसरात खळबळ उडाली असून, महिलांची गुन्हेगारीकडे वाढती प्रवृत्ती चिंतेचा विषय बनत आहे. पोलिसांकडून या टोळीचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button