City CrimecitynewsCrime NewsIndia NewsLatest News

दिल्लीतील धक्कादायक घटना: आईसमोरच मित्राची चाकूने हत्या, अनैतिक संबंधांच्या संशयातून मुलाचा हल्ला

देशाची राजधानी दिल्लीतील निहाल विहार परिसरात एक भीषण घटना घडली असून, एका तरुणाची भरदिवसा चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा मृताच्या मित्राचाच मुलगा असून, त्याने स्वतःच्या आईसमोरच ही हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी कंट्रोल रूममध्ये सुमित नावाच्या तरुणाचा फोन आला. त्याने आपल्या भावाची चाकूने हत्या झाल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मृत अमन हा आरोपी रोहितच्या आईसोबत पश्चिम विहारहून निहाल विहारकडे जात होता. त्याचवेळी आरोपी रोहित अचानक आपल्या दुचाकीवरून तेथे पोहोचला. त्याला आपल्या आई आणि अमन यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.

संशयाच्या भरात रोहितने कोणताही विचार न करता आईसमोरच अमनवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात अमन गंभीर जखमी होऊन रस्त्यावरच कोसळला. त्यानंतर आरोपी रोहित घटनास्थळावरून फरार झाला.

दरम्यान, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रोहितला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button