AmravatiCrime NewsLatest News

अमरावतीत संतापजनक प्रकार: १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, ५ आरोपी अटकेत

अमरावती जिल्ह्यातील भानखेडा गावाजवळील जंगल परिसरात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. १८ वर्षीय तरुणी आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना पाच जणांनी त्यांना अडवून तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिचा मित्र दुचाकीवरून प्रवास करत असताना आरोपींनी त्यांना अडवले. यावेळी दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच पीडितेच्या मित्राच्या खिशातील १५० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर आरोपींनी तरुणीला जंगलात नेऊन एकामागून एक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या अमानुष घटनेनंतर पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, फ्रेजरपुरा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.

या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button