Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

बडनेरा येथील प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूटमध्ये ‘यास्कावा सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन; विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला नवी दिशा

अमरावती (प्रतिनिधी):
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्चमध्ये आज एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद क्षण साकारला. यास्कावा इंडिया प्रा. लि. यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या ‘यास्कावा सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन उत्साहात पार पडले.

विदर्भ युवक कल्याण सोसायटीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून यास्कावा इंडिया प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुर्जर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या अत्याधुनिक सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली, तर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांसाठी उद्योगाभिमुख शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात कौशल्य विकसित करण्यासाठी अशा प्रकारच्या सेंटरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. यास्कावा कंपनीच्या सहकार्याने उभारलेले हे सेंटर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषासाठी नवी दिशा देणार आहे.

कार्यक्रमात रोबोटचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. उदय देशमुख, प्रा. डॉ. हेमंत देशमुख, सचिव युर्राजसिंह चौधरी, प्राचार्य डॉ. गजेंद्र बामणोटे, प्राध्यापक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून संस्थेच्या प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

“रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने विद्यार्थ्यांना सक्षम बनवणारा हा उपक्रम निश्चितच भविष्यात मोठी झेप घेण्यास मदत करणार आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button