AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

इराण-इजरायल युद्धाच्या अफवांचा परिणाम? राज्यभर पेट्रोल पंपांवर नागरिकांची झुंबड, २०० मीटरपर्यंत रांगा!

बुधवार सकाळपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पेट्रोल पंपांवर नागरिकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे…

इराण-इजरायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेल तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा वेगाने पसरत आहेत…
याच भीतीपोटी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यासाठी पंपांकडे धाव घेतली आहे…

सकाळी लवकरपासूनच दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या लांबच लांब रांगा पेट्रोल पंपांबाहेर लागलेल्या दिसत आहेत…
काही ठिकाणी या रांगा तब्बल २०० मीटरपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे…

या अचानक वाढलेल्या गर्दीमुळे अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे…

दरम्यान, अधिकृत पातळीवर पेट्रोल किंवा डिझेल तुटवड्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही…
तरीही अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे…

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की,
अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अनावश्यक गर्दी टाळा…

तर इंधन तुटवड्याची कोणतीही अधिकृत माहिती नसतानाही अफवांमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती चिंताजनक आहे…
अशा वेळी नागरिकांनी संयम बाळगणं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button