citynewsLatest NewsMaharashtra

युद्धाचे पडसाद शिक्षण क्षेत्रावर; इंधन तुटवड्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल, परीक्षांवर परिणामाची भीती

दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता थेट शिक्षण क्षेत्रावर उमटताना दिसत आहेत. भारत देशात गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून, अनेक विद्यार्थी शहर सोडून गावाकडे परतत असल्याची माहिती समोर येत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर झालेल्या परिणामाचा थेट फटका शहरांमध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बसत आहे. गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे स्वयंपाकाची मोठी अडचण निर्माण झाली असून, अनेक विद्यार्थ्यांनी आपले रूम बंद करून गाव गाठल्याचे चित्र आहे.

दरम्यान, कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकांनीही चिंता व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती घटल्यामुळे नियमित अभ्यासक्रमावर परिणाम होत असून, काही ठिकाणी बॅचेस रद्द करण्याची वेळ आली आहे.

इंधन तुटवड्यामुळे वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेज आणि क्लासेसला जाणे कठीण झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे.

येत्या काही महिन्यांत बोर्ड, विद्यापीठ आणि स्पर्धा परीक्षा होणार आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास खंडित होत असल्याने परीक्षांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षण तज्ञांच्या मते, सरकारने तातडीने उपाययोजना करून विद्यार्थ्यांना दिलासा देणे अत्यावश्यक आहे.

या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे… अन्यथा येणाऱ्या परीक्षांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button