Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत इंधन टंचाईची चाहूल? काही पेट्रोल पंप बंद, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण

अमरावती शहरातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे…

शहरातील काही पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा जाणवू लागला असून, काही ठिकाणी पंप बंद ठेवण्याची वेळ आल्याची माहिती समोर येत आहे…

अमरावतीत सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेबाबत अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे…
शहरातील काही प्रमुख पेट्रोल पंपांवरील साठा संपल्यामुळे ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे…

विशेष म्हणजे, इर्विन चौक परिसरातील एक महत्त्वाचा पेट्रोल पंप पूर्णपणे बंद असल्याचं समोर आलं आहे…
या पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा स्टॉक संपल्यामुळे वाहनधारकांना परत फिरावं लागत आहे…

दरम्यान, शहरातील इतर पेट्रोल पंपांवरही मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली असून, अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे…
इंधनाच्या तुटवड्यामुळे काही नागरिकांची दैनंदिन कामंही ठप्प झाल्याची प्रतिक्रिया समोर येत आहे…

या सर्व घडामोडींमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे…
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण-इजरायल संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे…

मात्र, अधिकृत स्तरावर याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही…
प्रशासनाकडून अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन आलेलं नसून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे…

तर अमरावतीत निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे…
आता प्रशासन यावर काय भूमिका घेते… आणि इंधन पुरवठा कितपत सुरळीत होतो…
हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button