AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई! दुचाकी चोरी प्रकरणाचा पर्दाफाश, आरोपी रंगेहात अटक

अमरावती शहरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांवर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे…

पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवत चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे…

पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की,
एक संशयित इसम अमरावती बस डेपो परिसरातून सुंदरलाल चौकाकडे चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी घेऊन जात आहे…

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचत पोलीस मुख्यालय मैदानासमोर कारवाई केली…
आणि आरोपीला रंगेहात ताब्यात घेतलं…

तपासादरम्यान आरोपीकडून काळ्या रंगाची CBZ Xtreme (MH 27 AQ 9052) ही मोटारसायकल जप्त करण्यात आली…

चौकशीत आरोपीने ही मोटारसायकल सुमारे २० दिवसांपूर्वी पंचवटी चौकातील पीडीएमसी हॉस्पिटल गेटसमोरून चोरी केल्याची कबुली दिली…

या कारवाईमुळे गाडगे नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला आहे…

अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद सुफीयान युसुफअली शाहा (वय २४, रा. साबनपुरा, अमरावती) असा असून
त्याच्याकडून सुमारे २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे…

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास गाडगे नगर पोलीस करत आहेत…

तर अमरावती गुन्हे शाखेच्या या तत्पर कारवाईमुळे वाहनचोरी करणाऱ्यांवर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे…
आता पुढील तपासातून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का…
हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button