Latest NewsNagpur

रामटेक तालुक्यात वाघाचा हल्ला; शेतात काम करणाऱ्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर

नागपूर जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली असून रामटेक तालुक्यात शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ही घटना रामटेक तालुक्यांतर्गत येणाऱ्या पवनी वन विभागाच्या एक संघ नियंत्रण कक्षातील सिल्लारी परिसरात मंगळवार, ६ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास घडली. संगीता गोपीचंद वघारे (वय अंदाजे ४० ते ४२) या शेतात काम करत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की संगीता वघारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

संगीता वघारे या मूळच्या पारशिवनी तालुक्यातील नयाकुंड गावच्या रहिवासी असून कामानिमित्त त्या सध्या सिल्लारी परिसरात वास्तव्यास होत्या. घटनेची माहिती मिळताच वन विभाग व पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

मृतदेह देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाकडून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, संबंधित वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडून पुढील तपास व आवश्यक उपाययोजना सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button