विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेत एम.बी.ए. विभागाच्या विद्यार्थीनींना कलर कोट पुरस्कार

प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांच्या हस्ते विद्यार्थीनींचा गौरव
अमरावती (दि. 02.01.2026)- संत गाडगे बाबा अमरवती विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेत मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एम.बी.ए.) विभागाच्या विद्यार्थीनी कु. समिक्षा घाटोळ व कु. पल्लवी वानखडे यांच्या ‘इन्नोव्हेशन : हिडन व्हॅल्यू ऑफ विड’ या प्रकल्पाला कलर कोट पुरस्कार मिळाला आहे. प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांच्या हस्ते सदर विद्यार्थीनींना पुरस्काराने गौरविण्यात आले.
विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेत एम.बी.ए. विभागातील विकी कालबांडे, कु. सोनाली खोब्राागडे, अभिषेक गुल्हाने याही विद्याथ्र्यांनी आपापले संशोधन प्रकल्प सादर केले होते. कु. समिक्षा व कु. पल्लवी यांनी सादर केलेल्या ‘इन्नोव्हेशन : हिडन व्हॅल्यू ऑफ विड’ प्रकल्पास पुरस्कार प्राप्त झाला. ‘इन्नोव्हेशन : हिडन व्हॅल्यू ऑफ विड’ या प्रकल्पात उपद्रवी तणापासून डास प्रतिबंधक स्प्रे आणि रुम फ्रेशनर अशी हर्बल उत्पादने तयार करण्यात आली आहेत. ही उत्पादने स्वस्त, पर्यावरणपुरक व लहान मुले तसेच मोठ¬ांसाठी सुरक्षित आहेत. त्यामुळे सदर उत्पादने ही रासायनिक घरगुती वस्तुंना चांगला पर्याय ठरू शकतात. त्याचबरोबर घर, कार्यालये, शाळा, रुग्णालये, वसतिगृहे, सार्वजनिक ठिकाणी वापरण्यासाठी उपयुक्त असून पर्यावरणाशी संबंधित समस्या सोडविण्यास मदत होते. विद्याथ्र्यीनींच्या या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे तसेच एम.बी.ए. विभागप्रमुख डॉ. दीपक चाचरकर यांनी विद्यार्थीनींचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.



