Latest NewsMaharashtraNagpur
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची प्रधान सचिवपदी पदोन्नती

नागपूर, दि. ३१ : नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना आज प्रधान सचिवपदी पदोन्नती देण्यात आली असून, त्या सध्याच्याच नागपूर विभागीय आयुक्त पदावर स्थानापन्न राहणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झालेल्या शासकीय आदेशानुसार, विजयलक्ष्मी बिदरी यांचे सध्याचे पद भारतीय प्रशासन सेवेच्या प्रधान सचिव श्रेणीत उन्नत करण्यात आले आहे. तसेच सदर पदोन्नती सध्याच्याच पदावर स्थानापन्न स्वरूपात देण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.



