Latest NewsMaharashtra PoliticspoliticsWashim
वाशिम नगराध्यक्षपदासाठी आठ उमेदवार मैदानात

मागे घेण्यासाठीची अंतिम मुदत दुपारी 3 वाजेपर्यंत होती. वाशिम नगराध्यक्षपदासाठी एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही, त्यामुळे एकूण 8 उमेदवार रिंगणात कायम आहेत.
या उमेदवारांमध्ये पुढील पक्ष आणि गटांचा समावेश आहे –
- भाजप
- ठाकरे गट (महाविकास आघाडी)
- राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट
- वंचित बहुजन आघाडी
- आम आदमी पार्टी
- एमआयएम
- तसेच दोन अपक्ष
यामुळे वाशिममध्ये यंदाची निवडणूक चुरशीची आणि बहुरंगी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रिसोड नगरपरिषद : दोन प्रभागांमध्ये सरळ लढत
रिसोड नगरपरिषद निवडणुकीतही मागे घेण्याची अंतिम प्रक्रिया पार पडली.
- प्रभाग 5-ब : दाखल चार उमेदवारांपैकी एका उमेदवाराने माघार घेतली असून आता 3 उमेदवार आमने-सामने आहेत.
- प्रभाग 10-अ : दाखल पाचही उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे या प्रभागात 5 उमेदवारांची थेट लढत होणार आहे.
20 डिसेंबरकडे सर्वांचे लक्ष
आता दोन्ही नगरपरिषदांच्या निकालाबाबतची उत्सुकता वाढली असून 20 डिसेंबरच्या मतदानात मतदार कोणावर विश्वास टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



