१२ डिसेंबर | विधीमंडळ अधिवेशन

१२ डिसेंबर रोजी सभागृहात मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यात आले. अतिक्रमण नियमितीकरणाचे नियम स्पष्ट करण्यात यावेत, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानवाढ देण्यात यावी आणि मोर्शी–वरुड मतदारसंघाला ड्राय-झोनमुक्त करण्याची मागणी करण्यात आली.
संत्रा उत्पादकांवर वाढत्या खर्चाचा मोठा बोजा पडत असल्याने त्यांना तातडीने आर्थिक मदत आवश्यक असल्याचे सभागृहात सांगण्यात आले. ड्राय-झोनमुळे मोर्शी–वरुड भागात पाण्याची गंभीर समस्या असून, त्या भागाला ड्राय-झोनमधून मुक्त केल्यास विकासाला गती मिळेल, असा मुद्दा मांडण्यात आला.
नागपूरमध्ये सुरू असलेल्या पोलीस पाटील मोर्चातील सहभागी सर्वांना न्याय मिळावा, त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही सभागृहात व्यक्त करण्यात आली.
याशिवाय, मतदारसंघातील अनेक विकासकामे प्रलंबित असल्याकडे शासनाचे लक्ष वेधले गेले. ही कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी विनंतीही करण्यात आली.



