अंबा महाकुंभ रासगरब्यामध्ये सहाव्या दिवशीच्या रासगरबा मध्ये चिल्ड्रेन थिमव्दारे चिमुकल्यांनी केला भन्नाट रासगरबा

सहाव्या दिवशीच्या रासगरब्याला समाजसेवक नानकरामजी नेभनानी, चंद्रकुमार जाजोदिया, मनोज बख्तार, विक्की खत्री, सुमित दादलानी यांची विशेष उपस्थिती
अमरावती – संपूर्ण अमरावती शहरामध्ये परंपरा गृपव्दारा आयोजित अंबा महाकुंभ रासगरबा भाग – 2 हा प्रसिध्द असून या रासगरब्याला भेट देण्याकरीता व खेळण्याकरीता युवक व युवती तसेच नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे आयोजकांच्या वतीने रासगरबाच्या वेगवेगळया थिम घेवुन नागरीकांना आकर्षीक करण्यात येत आहे.
रासगरब्याच्या सहाव्या दिवशी आयोजकांव्दारे चिल्ड्रेन थिम हे थिम घेण्यात आली होती. या थिमवर शेकडो चिमुल्यांनी भन्नाट रासगरबा करुन उपस्थित सर्व नागरीकांची मने जिंकली.
या संपूर्ण रासगरब्याला यशस्वी करण्याकरीता अनुपमा राणा, स्नेहल गुल्हाने, नितु गोयनका, श्वेता तन्ना, पुजा बोरकर,मयुरी सेठीया, कविता मंत्री, संगीता सावळे, शितल पिवाल, वर्षा लुल्ला, प्रित संतवानी, रेणु खत्री, रीया नांदवानी, सोनल नांदवानी, पिंकी चांदवानी, रोहीनी अनासाने, प्रिती रेवणे, सुनिल राणा, नितीन अनासाने, राहुल बजाज, मनोज चांदवानी, किशोर पिवाल, दिनेश सेठीया, दिनेश अग्रवाल, विनय तन्ना, अंकुश गोयनका, संदिप गुल्हाने, प्रविण सावळे, वैभव बजाज, नितीन बोरेकर, महेश मुलचंदानी, विजय मोटवानी, धिरज हिरानी, महेंद्र लायत, सागर मतानी, विश्वनाथ अरोरा, राजेश कटारीया, अजय बोबडे, मनोज डहाके, राकेश अहेजा, अंजय सोजरानी, हर्षल रेवणे, करण आश्रा, विनय राजानी यांनी परीश्रम घेत आहे.



