आ. रवि राणा यांचा विविध नवदुर्गा मंडळांना संदिच्छा भेटीसह घरोघरी जावुन घेतले महालक्ष्मी दर्शन

यामध्ये किरण नगर, वडरपुरा, महाविर नगर, ईश्वर कॉलनी, समर्थ कॉलनी, गडगडेश्वर, हरीशांती कॉलनी, इद्रपुरी शाळे जवळ न्यु गणेश कॉलनी इत्यादी परीसरातील मंडळांचा समावेश
अमरावती – दरवर्षी प्रमाणे यंदाही नवरात्रीच्या पावन पर्वावर आ.रवि राणा यांनी बडनेरा मतदार संघातील विविध दुर्गा मंडळाना सदिच्छा भेटी दिल्या. तसेच नवरात्रीच्या दिवसामध्ये सुध्दा अनेक ठिकाणी महालक्ष्मी बसविण्यात येतात. त्या निमित्याने ज्या ठिकाणी महालक्ष्मीचे आगमन झाले होते. त्या घरी सुध्दा जावुन महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यामध्ये किरण नगर येथे दुर्गा देवी मंडळ, जय गुरुदेव सेवा नवयुवक नवदुर्गोत्सव मंडळ, वडरपुरा, गडगडेश्वर येथील दुर्गादेवी उत्सव मंडळ, चंद्रधर नगर, सुशिल नगर, देशपांडे प्लाट, शिवशक्ती नगर, सरोज कॉलनी, हरीओम कॉलनी, एकनाथपुरम त्याचप्रमाणे शामदास गुजर येथील महालक्ष्मी दर्शन, प्रविण बनकर यांचे घरी महालक्ष्मी दर्शन, एकता दुर्गोत्सव मंडळ महाविर नगर आदि ठिकाणी जाऊन दर्शन घेतले.



