विजयादशमीला खंडाळा देवीत भक्तीचा महापूर! आई जगदंबेच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी

जय जगदंबेच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला; सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी भाविकांनी घेतले मातेचे आशीर्वाद
मेहकर, बुलढाणा | प्रतिनिधी गजानन राऊत
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात असलेल्या खंडाळा देवी येथे विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त आई जय जगदंबा देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले, तर अनेकांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
जय जगदंबेच्या जयघोषाने परिसर भक्तिमय
आई जय जगदंबा मंदिराला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे भाविकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर परिसरातील गावांसह दूरवरूनही भाविकांनी मंदिरात हजेरी लावली.
आई जगदंबेचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणामुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.

सुख, समृद्धीसाठी मातेच्या चरणी प्रार्थना
दसऱ्याच्या पवित्र पर्वानिमित्त भाविकांनी कुटुंबाच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना केली. श्रद्धा आणि भक्तीने भारलेल्या वातावरणात खंडाळा देवी येथे विजयादशमीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
सिटी न्यूज | गजानन राऊत, मेहकर, बुलढाणा



