citynewsLatest NewsMaharashtraMumbai
नवी मुंबईत हळहळ! वाशीच्या कोपरी तलावात दोन मुले बुडाली

एका मुलाचा मृतदेह आढळला; दुसऱ्या मुलाचा शोध सुरू, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल
नवी मुंबई | सिटी न्यूज
नवी मुंबईतील वाशी येथील कोपरी गाव परिसरातील तलावात दोन लहान मुले बुडाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. या घटनेत एका मुलाचा मृतदेह आढळला असून, दुसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अग्निशमन दलाकडून शोधमोहीम सुरू
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वाशीतील कोपरी गाव येथील तलावात सकाळच्या सुमारास दोन मुले बुडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एका मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, दुसऱ्या मुलाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली. दोन्ही मुलांची ओळख, वय आणि ही घटना नेमकी कशी घडली, याबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.
सिटी न्यूज | नवी मुंबई



