Accident NewscitynewsLatest NewsMaharashtra

कराडच्या युनिक उड्डाणपुलावर भीषण अपघात! स्कॉर्पिओचा चक्काचूर, चौघांचा जागीच मृत्यू

भरधाव स्कॉर्पिओची ट्रकला पाठीमागून धडक; त्यानंतर छोट्या हत्तीलाही धडक, तीन जण गंभीर जखमी

कराड | सिटी न्यूज

सातारा जिल्ह्यातील कराड येथील युनिक उड्डाणपुलावर रात्री भीषण अपघात झाला. कोल्हापूर ते सातारा लेनवर भरधाव स्कॉर्पिओने पाठीमागून ट्रकला जोरदार धडक दिली. धडकेनंतर स्कॉर्पिओ फिरली आणि तिचे तोंड विरुद्ध दिशेला झाले. यानंतर पाठीमागून येणाऱ्या छोट्या हत्ती वाहनालाही स्कॉर्पिओची धडक बसली.

या भीषण अपघातात स्कॉर्पिओचा चक्काचूर झाला. वाहनातील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताची तीव्रता मोठी असल्याने परिसरात खळबळ उडाली. या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. अपघात नेमका कशामुळे घडला आणि मृत-जखमींची अधिकृत ओळख याबाबतची माहिती संबंधित यंत्रणांकडून स्पष्ट होणे बाकी आहे.

सिटी न्यूज | कराड

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button