सिटी न्यूज कार्यालयासमोर वीर प्रताप नवदुर्गा मंडळाची भव्य महाआरती

सराफा बाजारातून निघालेल्या विसर्जन शोभायात्रेचे सिटी न्यूज कार्यालयासमोर स्वागत; २० वर्षांची परंपरा कायम
अमरावती : सराफा बाजारातील वीर प्रताप नवदुर्गा उत्सव मंडळाची विसर्जन शोभायात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही सिटी न्यूज कार्यालयासमोर दाखल झाली. यावेळी आई जगदंबा भवानीची भव्य महाआरती करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यात भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
विशेष म्हणजे, सिटी न्यूज कार्यालयासमोर विसर्जन शोभायात्रेचे स्वागत करण्याची ही परंपरा मागील २० वर्षांपासून अविरत सुरू आहे. शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या भाविक भक्तांचे तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना अल्पोपाहाराचे वितरण करण्यात आले.
यावेळी सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉ. चंदू सोजतिया यांनी वीर प्रताप नवदुर्गा उत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात आई जगदंबा भवानीसमोर उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे नृत्य करत आनंद व्यक्त केला.
महाआरती, भक्तिभाव आणि ढोल-ताशांच्या निनादात हा सोहळा उत्साहात पार पडला. दोन दशकांपासून जपली जाणारी ही परंपरा यंदाही भक्ती आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारी ठरली.
सिटी न्यूज | अमरावती



