Latest NewsMaharashtra Politics

कुणाल सोनी यांचे पुढाकारातून अनेक भा ज पा कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश…

डॉ.सुनील देशमुख यांचे जनसंपर्क कार्यालय येथे छोटेखाणी सोहळा संपन्न 

नुकतेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी पालकमंत्री डॉ श्री सुनीलभाऊ देशमुख यांचे उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष कुणाल सोनी यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलेला होता. आज कुणाल सोनी यांचे पुढाकाराने अमरावती शहरातील विविध भागांतील भाजप कार्यकर्त्यांनी डॉ.सुनील देशमुख यांचे नेतृत्वात आज काँग्रेस पक्षात औपचारिक प्रवेश केला.  

यावेळीवशहर जिल्हा काँग्रेसचे कोषाध्यक्ष श्री आनंदबाबू भमोरे, कोमलभाऊ बोथरा,राजनजी भन्साली, ओमप्रकाश चांडक, विनोद मोदी, सुरेश रतावा, रोहीत राठी, कुणाल सोनी प्रामुख्याने उपस्थित होते . आज पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये  प्रामुख्याने यश महाजन, जय तायलकर, राहूल गेडाम, आदित्य ठवळी, आदित्य लोणारे, मयूर ठाकरे, चेतन भोजने, करण तायलकर, अश्वजीत तायडे, सुमित वानखडे, सुमित निंदाने, रोहन चौहान, तुषार चावरे, लोकेश गोहर, सचिन इंगळे, सर्वेश महाजन, कल्पेश मेश्राम इ.कार्यकर्त्यांचा समावेश आहे. याप्रसंगी आपले मत व्यक्त करतांना कुणाल सोनी यांनी डॉ सुनील देशमुख यांचे प्रगल्भ आणि विकसनशील विचारामुळे प्रभावित होऊन या सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि अजूनही बरेचसे कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले आणि आम्ही सर्व कार्यकर्ते काँग्रेस पक्षा सोबत सदैव राहू असे आश्वासन दिले. या प्रसंगी आपले अध्यक्षीय भाषणातून काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करून सर्व सन्माननीय कार्यकर्त्यांना सन्मान देण्यात येईल असे सांगितले. याप्रसंगी सर्व सन्माननीय सदस्यांचा काँग्रेस महासचिव सुरेश रतावा यांनी उपस्थीत कार्यकर्त्यांना परिचय करून दिला, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विनोद मोदी यांनी केले, या प्रसंगी सर्वश्री दिपक उपाध्याय, अमोल तिवलकर, प्रशांत लढ्ढा, सचिन मुंदडा, किशोर अग्रवाल, पराग चांडक, विशाल धांडेकर, साहिल तायलकर, सतीश पडोळे, प्रतीक खरबडे, प्रदिप गुप्ता, जय बुंदेले, प्रथमेश काळे, निरज कुसराम, सारंग बढिये, भूषण तिवलकर दर्शन कळमकर, यश मोटघरे इ. सन्माननीय मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button