प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाची पंचमाला म्हणजेच एकूण पाच सेवा कार्यक्रम व धार्मिक कार्यक्रम करून मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

डॉ. नितीन धांडे यांच्या नेतृत्वात भाजपा अमरावती शहर जिल्ह्याचे आयोजन
दिनांक 17 सप्टेंबर 2025
भारताचे यशस्वी व कर्तृत्ववान पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष डॉ.नितीनजी धांडे यांच्या नेतृत्वामध्ये तसेच राज्यसभा खासदार डॉ.श्री अनिलजी बोंडे, भाजपाचे माजी शहर अध्यक्ष श्री प्रवीणजी पोटे पाटील,प्रदेश प्रवक्ते श्री शिवरायजी कुलकर्णी, भाजप नेते श्री किरणजी पातुरकर, प्रा.दिनेशजी सूर्यवंशी,सरचिटणीस श्री बादलजी कुळकर्णी, श्री ललितजी समदुरकर, सौ.राधाताई कुरील,श्री चेतनजी पवार,मनपा माजी पक्षनेता श्री सुनील काळे, माजी स्थायी समिती सभापती श्री सचिन रासने ॲड.प्रशांतजी देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने कार्यक्रमाची पंचमाला म्हणजेच विविध पाच सेवा कार्यक्रम तथा धार्मिक कार्यक्रम करून आयोजित करण्यात आले, यामध्ये सकाळी नऊ वाजता अमरावती कुलस्वामिनी अंबा देवी व एकवीरा देवी येथे भव्य महाआरती चे आयोजन करण्यात आले, यावेळी मोदींच्या साठी अंबा मातेच्या, एकविरा मातेच्या, चरणी प्रार्थना करण्यात आली,
यानंतर सकाळी दहा वाजता भूतेश्वर चौक अमरावती येथील रस्त्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले, किसान मोर्चा चे अमरावती शहराध्यक्ष श्री मिलिंद बांबल यांच्या संयोजनामध्ये हा कार्यक्रम पार पडला, या ठिकाणी देखील भाजपाच्या अमरावती शहर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली, स्वच्छ भारत अभियान प्रधानमंत्री मोदीजींचे मिशन आहे आणि हे अभियान या ठिकाणी करून मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, यानंतर महिला मोर्चाच्या शहर सरचिटणीस सौ सविता भागवत यांच्या माध्यमातून नमुना गल्ली नंबर सहा येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले, गरजू रुग्णांनी लाभ घेतला या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर नितीन धांडे यांनी केले, आणि आरोग्य विषयक अनेक योजना मोदी सरकारने आणलेल्या असून प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, तसेच राज्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे डॉक्टर धांडे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले,
यानंतर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे सकाळी 10:30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत स्थानिक भाजपा कार्यालय लक्ष्मण स्मृती राजापेठ येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन युवा मोर्चा अध्यक्ष श्री विक्की शर्मा यांनी केले भाजपा आता युवा मोर्चा चे पदाधिकारी मोदीजींवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना भाजपा अमरावती शहर जिल्हाध्यक्ष डॉ.श्री नितीनजी धांडे हे असं म्हणाले की पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आज देशाला ज्या प्रगतीपथावर घेऊन जात आहेत ते उल्लेखनीय आहे आज त्यांचा 75 वा वाढदिवस असून देखील त्यांच्या कामाचा ओघ बघितला तर ते एखाद्या 25 वर्षीय युवा पेक्षा कमी नाही आणि त्यामुळे नरेंद्रजी मोदी हे युवांचे प्रेरणास्थान आहेत आणि त्यामुळे हे रक्तदान शिबिर युवा मोर्चाला आयोजित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने दिलेले आहे, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ.अनिल बोंडे उपस्थित राहिले,या रक्तदान शिबिरामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथील रक्तपेढीची टीम इथे उपस्थित राहिली, तसेच एकूण 79 रक्तदात्यांनी रक्तदान करून मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यानंतर सायंकाळी चार वाजता अंबादेवी संस्थान अमरावती येथे भाजपा अमरावती शहर जिल्हा अध्यात्मिक प्रकाश चे संयोजक श्री प्रवीणजी अंबुलकर आणि प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ मीनाताई पाठक यांच्या वतीने मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी रामरक्षा कवच सामूहिक पठण कार्यक्रम करण्यात आला, हा कार्यक्रम देखील अतिशय उत्साहामध्ये साजरा झाला या कार्यक्रमाला सुद्धा भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी तसेच राम रक्षा कवच पठण करणारे आणि सर्व रामभक्त तसेच प्रधानमंत्री मोदीजींवर प्रेम करणारे नागरिक आणि विशेष करून या कार्यक्रमांमध्ये महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते,
या सर्व कार्यक्रम प्रसंगी सेवा पखवाडा संयोजक श्री मंगेशजी खोंडे, सह संयोजक श्री.प्रविण वैश्य,श्री.कौशिक अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष श्री.संजय नरवने, श्री.संजय तिरथकर,सौ.गंगाताई खारकर,, श्री सुनील खराटे श्री.राजू राजदेव,सौ.सुरेखाताई लुंगारे,श्री.राजेंद्र मेटे,श्री.सुनिल साहू,श्री.राजू कुरील, नगरसेविका सौ स्वाती कुलकर्णी, प्रणित सोनी सौ लाविना हर्षे, सौ पद्मजा कौंडण्य, श्रीचंद तेजवानी, अजय सारसकर, रीता मोकलकर,सचिव डॉ.विरेंद्र ढोबळे,श्री.प्रमोद राउत, तुषार चौधरी, श्याम साहू, हरीश साऊरकर,श्री.शैलेंद्र मिश्रा,सौ.माधुरीताई ठाकरे,सौ.वनमालाताई सोनोने,श्री.मनोज काळे,श्री.राजेश किटुकले,सौ.वंदनाताई मडघे,सौ.पंचफुलाताई चव्हाण,श्री.आत्माराम पुरसवाणी,श्री.प्रदिप सोळंके,श्री.अमृत यादव, भाजपा शहर मोर्चा अध्यक्ष — सौ.सुधाताई तिवारी,श्री.विवेक चुटके,श्री.अमोल थोरात,श्री.एजाज अख्तर,श्री.मिलिंद बांबल, शहर जिल्हा प्रकोष्ठ अध्यक्ष — श्री.बलदेव बजाज,श्री.सारंग राउत,श्री.दिपक पोहेकर,श्री.अखिलेश खडेकार,श्री.अंकेश गुजर,श्री.रोहित यादव,सौ.रेखा शेंद्रे,श्री.चिराग नवलानी,श्री.सागर शहा,श्री.सुहास गोंगे,श्री.प्रविण अंबुलकर,श्री.अशोक नागवाणी,श्री.रविकांत कोल्हे,श्री.संजय चव्हाण,श्री.प्रसाद जोशी,सौ.कीर्ती इखार,श्री.शिवाजी आवटे,श्री.सदूभाऊ पुंशी, मंडळ अध्यक्ष — श्री.उमेश निलगिरे, सौ.भारती गुहे,श्री.मनिष चौबे,श्री.अभिजित वानखडे,श्री.प्रफुल बोके,श्री.संतोष कावरे,श्री.सचिन नाईक,मंडळ सरचिटणीस — श्री.नरेश धामाई,श्री.गौरव बांते,श्री.योगेश निमकर,श्री.कार्तिक सामदेकर,सौ.शुभांगी टाले,श्री.विनोद ठोसर,श्री.अमित राठोड,श्री.अमोल आगरकर,श्री.आकाश दानखेडे,श्री.गणेश खोत,श्री.आकाश जाधव,श्री.अमित कुलवंत,सौ.किरण गुप्ता,श्री.ऋषिकेश चौबे,श्री.आकाश कविटकर,सौ.बेबीताई शर्मा,श्री.मनोज काळे,श्री.गोपाल साहू , भूषण हरकुट, शुभम वैष्णव, सुरज जोशी, प्रवीण रुद्रकार, मंडळ मोर्चा अध्यक्ष श्री.विकास सुने,सौ.तृप्ती वाठ,श्री.सौरभ रत्नपारखी,सौ.छाया माकोडे,श्री.अक्षय बुंदिले,सौ.अंजली पाठक,श्री.सुमित गुल्हाने,सौ.माधुरी दरोकार,श्री.साहिल बुंदेले,सौ.तुलसी बिरेली,श्री.किर्तीदीप सराफ,सौ.बरखा बोज्जे,श्री.अभिषेक जोशी,सौ.रेखा कैथवास भाजपा अमरावती शहर जिल्हा पदाधिकारी मंडळ पदाधिकारी सेल आघाडी मोर्चा प्रकाश याचे संयोजक सहसंयोजक इत्यादी उपस्थित राहिले..
पुढे दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यंत विविध कार्यक्रम भाजपा अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण अमरावती शहरांमध्ये राबविल्या जाणार आहेत अशी माहिती भाजपा अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने देण्यात आली.



