मुंबईत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना

मुंबई – मुंबईत घडलेल्या या घटनेने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते संतापले आहेत.
नांदेड शहरातील महात्मा फुले चौक येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि इतर आघाडीतील पक्षांनी एकत्र येत निषेध मोर्चा काढला.
या वेळी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रकाश मारावर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ही घटना ठाकरे कुटुंबाचा अपमान असून संपूर्ण राज्यातील ठाकरे गट शांत बसणार नाही.
जर आरोपींना तातडीने अटक झाली नाही तर नांदेड जिल्हा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनावर आता कठोर कारवाई करण्यासाठी दबाव वाढत चाललाय.



