Education NewsLatest News

शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा ‘स्व-शासन’ अनुभव

खामगाव :- स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गो. से महाविद्यालय, खामगाव च्या  वाणिज्य विभागात  १० सप्टेंबर २०२५ रोजी “स्व-शासन” या संकल्पनेवर आधारित शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळून शिक्षकांचा गौरव केला. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची विशेष समिती गठित करण्यात आली होती. विद्यार्थी-प्राचार्य म्हणून जयगणेश कनुकोलानु, विद्यार्थी विभागप्रमुख म्हणून आकांक्षा आटोले, सचिव म्हणून हिमांशु राठी, कार्यक्रम सचिव म्हणून धनश्री मिश्रा यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. समितीतील अन्य सदस्यांनी शिक्षक सहाय्यक, वर्गव्यवस्था, स्वच्छता, तांत्रिक कामकाज, छायाचित्रण व अहवाल तयार करण्याची जबाबदारी सांभाळली. एकूण २४ विद्यार्थी-शिक्षकांनी वेगवेगळ्या वर्गांना प्रभावीपणे शिकविले.

                यानंतर विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गो. से. महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एस. तळवणकर यांनी भूषविले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “सावित्रीबाई फुले” या लघु नाट्याला उपस्थितांकडून दाद मिळली. विद्यार्थी-प्राचार्य व विद्यार्थी विभागप्रमुख यांनी प्राचार्य व विभागप्रमुख या एकदिवसीय भूमिकेचा अनुभव सांगितला. तसेच काही विद्यार्थ्यांनी “आमच्या अपेक्षेतील आदर्श शिक्षक” या विषयावर आपले विचार व्यक्त केले. बी. कॉम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी मुक्ता भोजने व प्रणाली खोंदिल यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन हरिओम पुडागे ह्यानी केला.

“शिक्षकांनी आजीवन विद्यार्थी राहण्याची वृत्ती जोपासली पा हिजे,” असे मनोगत इंग्रजी विभागाचे डॉ. पी. पी. ठाकूर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. डी. एन. व्यास हयांच्यामनोगताने झाला, तर प्राचार्यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण व जबाबदार सहभागाचे कौतुक केले आणि हा उपक्रम संस्मरणीय ठरल्याचे गौरवोद्गार काढले. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे डॉ. रागीब देशमुख यांनी कळविले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button