गो. से. महाविद्यालय खामगाव येथे हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न

खामगाव :- स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गो. से महाविद्यालय, खामगाव येथे आज हिंदी विभागाद्वारे दरवर्षीप्रमाणे घेण्यात येणारी हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धा आज दिनांक रोजी13/09/2025 रोजी घेण्यात आली यामध्ये हिंदी विषयासी संबंधित प्रश्न व पुरस्कार इ.प्रश्नांचा समावेश होता यामध्ये महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हिंदी विभागाद्वारे दरवर्षीप्रमाणे हिंदी दिवस सोबतच हिंदी पखवाडा यांचे आयोजन केल्या जाते त्यामध्ये हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धा, हिंदी निबंध स्पर्धा ,हिंदी, काव्य पाठ व इतर कार्यक्रमाचा सहभाग कार्यक्रम घेतल्या जाते ह्या कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका अदा करणारे आमचे प्राचार्य डॉक्टर धनंजय तळवणकर व विदर्भ शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर सुभाषजी बोबडे व सचिव माननीय श्री डॉक्टर प्रशांत नरेंद्रजी बोबडे मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन हिंदी विभागा ने केले. विभागाध्यक्ष डॉ. शेखर खडसे व डॉ. भारत जवंजाळ तसेच प्रा.सुभाष दिनकर वाघ व, डा.अनिताकौर कामठेकर. पूजा टेकाळे प्रा. विक्रम मोरे, प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख, डॉ. व्ही .एम. देशमुख प्रा. डी. एस. भुतेकर .प्रा. देवानंद आढाव, प्रा. अकोटकर, प्रा.टकले, व समस्त प्राध्यापक वर्गांचा समावेश होता. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे.



