विद्यापीठाच्या उन्हाळी-2025 बी.ए., एम.ए., एम.एस्सी., बी.कॉम.,गृहविज्ञान विषयाच्या पूनर्परीक्षा 16 जुलै रोजी होणार

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी – 2025 बी.ए. सेमि.-4 (सी.बी.सी.एस.), एम.ए. भाग-2 सेमि-4 गृह अर्थशास्त्र (सी.जी.एस.), एम.एस्सी. (अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स) सेमि-4 (सी.बी.सी.एस. नवीन), बी.कॉम. सेमि-1 (एन.ई.पी.) एम.एस्सी. (अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स) सेमि-2 (एन.ई.पी.) (टू इयर्स-फोर सेमिस्टर मास्टर डिग्री प्रोग्राम-एन.ई.पी.व्ही.23 विथ एक्झिट अॅन्ड एन्ट्री ऑप्शन) आणि गृहविज्ञान (फॅशन डिझायनिंग सेमि-5 या विषयांच्या पुनर्परीक्षा विद्यापीठाच्या प्राधिकारिणीने घेतलेल्या निर्णयानुसार दि. 16 जुलै, 2025 रोजी पूर्वीच्याच केंद्रांवर घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षेच्या वेळी विद्याथ्र्यांनी त्यांना देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणावे, असे परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी याची तातडीने आपल्या विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी. तसेच विद्याथ्र्यांनी सुध्दा याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षा विभागाच्या अधिका-यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.



