AmravatiLatest News

“शिवटेकडीचे हिरवे स्वप्न साकारतेय – आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण व पाहणी”

अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज शिवटेकडी परिसराची पाहणी केली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. या पाहणीवेळी माजी गटनेते दिनेश बुब यांच्यासह सध्या सुरू असलेल्या कामांवर सविस्तर चर्चा झाली.

शिवटेकडी परिसरात महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, शिवसृष्टी निर्मिती आणि विविध सौंदर्यीकरण कामे झाली आहेत. या कामांची प्रगती तपासण्यासाठी आयुक्तांनी थेट भेट देत स्थलदर्शन केले. यावेळी त्यांनी परिसरात नव्याने वृक्षारोपणासाठी योग्य जागा शोधण्यावर भर देत नियोजनात्मक दृष्टिकोनातून सूचना दिल्या.

आयुक्त चांडक यांनी सांगितले की, “पूर्वी टेकडीवरील वृक्षसंवर्धनाची स्थिती अत्यंत दुबळी होती. मात्र नागरिकांच्या सहकार्याने आज ही टेकडी हिरवळीत नटलेली आहे आणि शिवसृष्टीमुळे ही जागा भविष्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ ठरणार आहे.”
पाहणीदरम्यान त्यांनी स्वच्छतेच्या दृष्टीने सुरू असलेल्या ‘सफाई अपनावो, बिमारी भगावो’ या मोहीमेंतर्गत वृक्षारोपणही केले. १ जुलै ते ३१ जुलै २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या अभियानाच्या यशासाठी नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवटेकडीचे सौंदर्यीकरण सुरू असून, झाडांच्या आजूबाजूला सजावट, दगडांवर रंगीत कलाकुसर आणि स्वच्छताविषयक उपाययोजना करण्‍यात आल्‍या आहे. येथे दररोज अनेक नागरिक सकाळी-संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येतात. “या परिसराचे सौंदर्य आपण सर्वांनी मिळून जपले पाहिजे. येथे आल्यावर मन प्रसन्न होते,” असे उद्गार आयुक्तांनी यावेळी काढले.

पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, शहर अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नितीन बोबडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, उपअभियंता प्रमोद इंगोले, उद्यान अधीक्षक अजय विंचुरकर, अभियंता दिनेश हंबर्डे, निरीक्षक श्रीकांत गिरी, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक विजय बुरे, कुंदन हडाले, मोहित जाधव, मनीष नकवाल, निलेश तंबोले, मिथुन वाघमारे, राजेश वानखडे, राजेश पिदडी यांच्यासह अनेक मनपा कर्मचारी उपस्थित होते.

शिवटेकडीच्या रूपात अमरावतीच्या हरित पर्यटनास नवे बळ मिळत असून, महानगरपालिकेच्या पुढाकाराने या परिसराचे जतन आणि संवर्धन निश्चितपणे प्रेरणादायी ठरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button