AmravatiLatest News

बडनेरा झोनमध्ये अतिक्रमणावर धडक कारवाई: जयस्तंभ चौक व गुरुद्वारा परिसरातील अनधिकृत शेड व ओटे हटवले

अमरावती : महानगरपालिकेच्या आदेशानुसार, बडनेरा झोन अंतर्गत सोमवार आठवडी बाजार व जयस्तंभ चौक परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर आज सकाळी जोरदार कारवाई करण्यात आली. ही कारवाई सकाळी 11:30 वाजता सुरू होऊन दुपारी 4 वाजेपर्यंत चालू होती.

जयस्तंभ चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळा समोर तसेच गुरुद्वारा परिसरात अनेक दुकानदारांनी अनधिकृतरित्या शेड आणि ओटे उभारले होते. या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना तसेच वाहनचालकांना अडथळा निर्माण होत होता. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने कारवाईचे निर्देश दिले.

सदर मोहिमेत अतिक्रमण पथकप्रमुख श्री. श्याम चावरे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. बाजार परवाना अधीक्षक श्री. खळेकर, श्री. उदय चव्हाण, श्री. अजय बंसिले यांच्यासह बडनेरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सार्वजनिक रस्ते मोकळे झाल्यामुळे वाहतुकीला दिलासा मिळाला आहे. प्रशासनाकडून पुढील आठवड्यात इतर झोनमधील अनधिकृत अतिक्रमणांवरही अशाच पद्धतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button