AmravatiLatest News

श्रीराम नवमी निमित्त अमरावतीत भव्य शोभायात्रेचे आयोजन, पत्रकार परिषदेत दिली माहिती

अमरावती: अमरावती शहरात येत्या ६ एप्रिल रोजी (रविवार) श्रीराम नवमी निमित्त एक अद्वितीय भक्तीचा उत्सव पाहायला मिळणार आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने सीतारामबाबा मंदिर (बालाजी प्लॉट) येथून सायंकाळी श्रीराम नवमीची भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आले आहे.

या शोभायात्रेबाबत माहिती देताना अॅड. प्रशांत देशपांडे, रविराज देशमुख, बंटी पारवाणी, अनिल साहू, विजया सांगावार व विशाल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की —”श्रीराम नवमीच्या निमित्ताने अमरावतीकरांना एकत्र येत रामभक्तीत रंगण्याची ही सुवर्णसंधी आहे.” या शोभायात्रेला अनेक संत-महंत, धार्मिक संस्था, तसेच राजकीय नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे. जैन महिला मंडळ व इतर सामाजिक-धार्मिक संस्थांचा देखील सहभाग असणार आहे.

शहरातील वाढत्या गर्दीचा विचार करून आयोजकांनी सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि शिस्तबद्धतेसाठी विशेष तयारी केली आहे. शोभायात्रा शांततेत, भक्तिभावाने आणि सामंजस्याने पार पडण्यासाठी स्वयंसेवक व पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचं सांगण्यात आलं. ही शोभायात्रा केवळ मिरवणूक नाही, ती धर्म, संस्कृती आणि एकतेचं प्रतीक आहे. अमरावतीकरांना शोभायात्रेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button