AmravatiLatest News

गुढीपाडवा व चैत्र नवरात्र निमित्त शोभानगर दुर्गा मंदिरात भक्तिभावाचा भव्य सोहळा

अमरावती: अमरावतीतील शोभानगर परिसर गुढीपाडवा व चैत्र नवरात्रच्या पावन पर्वावर भक्तिभावाने न्हालं होतं. मा. दुर्गा देवी मंदिराच्या वतीने ४ आणि ५ एप्रिल रोजी भव्य दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

४ एप्रिल रोजी, मंदिरात श्री सप्तशक्ती विजय ग्रंथाचे महा पारायण आयोजित करण्यात आले आहे , ज्यात तब्बल ११११ भाविक भक्तांनी सहभाग घेतला. संपूर्ण परिसरात मंत्रोच्चारांच्या गजरात वातावरण भक्तिमय झालं. ५ एप्रिल, शनिवार — महाहवन, महाआरती आणि महाप्रसादाने नवरात्र उत्सवाचा समारोप अत्यंत आध्यात्मिकतेने करण्यात आला. मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला होता, आणि दिव्य प्रकाशाने उजळला होता. भाविकांसाठी बसण्याची, प्रसादाची व सुव्यवस्थित दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रम नियोजनबद्ध, भक्तिभावाने आणि शिस्तबद्धतेने पार पडला.

गुढीपाडवा आणि नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शहरातील हजारो नागरिकांनी एकत्र येऊन मा दुर्गा मातेला अभिवादन केलं. महाप्रसादाच्या कार्यक्रमात हजारो भक्तांनी लाभ घेतला, आणि या सोहळ्यामुळे शहरात अध्यात्म, भक्ती आणि संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button