AmravatiLatest News

सामाजिक कार्यामुळे वंचितांना मोठा आधार – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते

अमरावती: धर्म, जातीच्या पलिकडे माणूस केवळ माणूसच असतो, या आपल्या विद्यापीठ गीताप्रमाणे विद्यापीठ आणि समाज एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विद्यापीठाच्या संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राव्दारे गरजूंना विविध उपक्रमाव्दारे होणारी मदत ही निश्चितच अभिनंदनीय बाब असून अशाच समाजकार्यामुळे वंचितांना मोठा आधार मिळतो, असे उद्गार कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी काढले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राच्यातीने गरजूंना वस्त्रदान कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरू बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, व्य. प. सदस्य डॉ. व्ही.एम. मेटकर, संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट¬ुटचे अध्यक्ष डॉ. अनिल सावरकर, श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, अकोटचे अध्यक्ष श्री वासुदेवराव महल्ले, अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. दिलीप काळे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. अनिल सावरकर म्हणाले, संत अच्युत महाराजांनी एका मुस्लिम मुलीच्या ह्मदयरोगाच्या आजाराचे गांभिर्य ओळखून गोरगरीबांसाठी हॉस्पिटलची उभारणी केली आणि आज संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव असे अत्याधुनिक हॉस्पिटल असून त्या ठिकाणी अत्यल्प दरात मोठमोठ¬ा शस्त्रक्रिया केल्या जातात. संत गाडगे बाबांच्या विचाराला अनुसरुन हा कार्यक्रम होत असल्याचे सांगून डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. श्री वासुदेवराव महल्ले म्हणाले, पस्तीस वर्षांपूर्वी श्री संत वासुदेव महाराजांनी विद्यापीठात उद्बोधन केले होते. संत गाडगे बाबा व श्री संत वासुदेव महाराज यांच्या जीवनकार्यावर यावेळी त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलविषयी सचिव श्री पाचबांधे यांनी, तर संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचा परिचय श्री बाळकृष्ण आमले यांनी करुन दिला.
याप्रसंगी कांता धांडे, पुष्पा वंजारी, कल्पना ढेंगरे, सविता पारधी, गंगा महेंद्रकर, राजकुमार इंगळे, राजू मके·ार, रितेश तायडे, रमेश कोल्हे, नामदेव चाचरकर आदींना कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते वस्त्रदान करण्यात आले. तर संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीनुसार कार्य करणा-या अकोला येथील श्री सुखदेव भुतडा यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. धारणी तालुक्यातील लवादा येथील सहदेव शनिवारे यांनी बांबूपासून तयार केलेल्या संविधान उद्देशिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तसेच बांबूपासून तयार केलेले घड¬ाळ कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांना भेट देण्यात आले. राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. दिलीप काळे, सूत्रसंचालन श्री राजेश पिदडी, तर आभार चंद्रकांत पाखरे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, अमरावती शहरातील गणमान्य नागरिक, महिला, पुरुष उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button