Crime NewsLatest NewsNagpur

पारडी पोलिसांची मोठी कारवाई – ७ घरफोड्या आणि वाहन चोरीचे गुन्हे उघड; १० लाखांचा मुद्देमाल जप्त!

नागपूर :- नागपूर शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्याच्या दृष्टीने पारडी पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. तब्बल ७ मोठ्या चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करत, १० लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांच्या या जलदगती तपासामुळे नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण.

पाहुयात खास रिपोर्ट!

पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ ते २१ फेब्रुवारी २०२५ दरम्यान एका मोठ्या घरफोडीची घटना घडली. फिर्यादी सचिन नरेंद्र चांदेकर, वय ४१ वर्षे, हे त्यांच्या कुटुंबासह प्रयागराज कुंभमेळ्यासाठी बाहेर गेले होते. मात्र, या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून ६५,००० रुपयांचा ऐवज लंपास केला.

घटनेची तक्रार प्राप्त होताच, पारडी पोलिसांनी तातडीने CCTV फूटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान, तुषार सुरेश बोपचे (वय २०, राहणार कळमणा) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्या दोन साथीदारांची माहिती उघडकीस आली.

तपासादरम्यान तुषार बोपचे याने राज भुनेश्वर द्विवेदी (२१) आणि हर्ष भुनेश्वर द्विवेदी (२१), दोघेही अजनी येथील रहिवासी यांच्या मदतीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या आरोपींना अटक केली असून, त्यांनी पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ घरफोड्या, २ वाहनचोरी आणि कळमणा हद्दीत २ घरफोड्या असे एकूण ७ गुन्हे केल्याचे कबूल केले.

या टोळीच्या ताब्यातून १०,२७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात सोन्याचे दागिने, रोकड, मोबाईल, आणि चोरीची वाहने यांचा समावेश आहे.या यशस्वी कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजीत सिरसाठ आणि त्यांच्या पथकाने महत्वपूर्ण योगदान दिले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button