Amaravti GraminDharmikLatest News

संत गजानन महाराज पालखी स्वागत सोहळा

परतवाडा :- संत गजानन महाराज यांच्या पालखीचे भव्य स्वागत दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडत आहे. अचलपूर आणि परतवाडा येथे मोठ्या भक्तिभावाने पालखीचे आगमन झाले असून, हजारो भाविक या पवित्र सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

या विशेष सोहळ्याचा अहवाल पाहूया…

अचलपूर नगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती सौ. किरण मालू यांच्या निवासस्थानी संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले. शांती वाटिका येथे पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यानंतर, भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शहरातील प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक आणि प्रहार पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब राऊत यांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिक भव्य स्वरूपात पार पडत आहे.

संत गजानन महाराज पालखी सोहळ्याला मोठ्या भक्तिभावाने प्रतिसाद मिळत आहे. हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. परतवाडा येथे शांती वाटिका येथे आज दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button