AmravatiLatest NewsMaharashtra Politics

डफरीन परिसरात होणार १०० खाटांचे माता व बाल संगोपन केंद्राची नूतन इमारत.

अमरावती :- अमरावती मध्ये आरोग्य सेवांचा विस्तार व बळकटीसाठी आ. सौ. सुलभाताई खोडके यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असल्याने रुग्णांना नवी आरोग्य संजीवनी मिळाली आहे. अशातच आता गर्भवती महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी मदत व्हावी , आई आणि बाळाला आधार मिळावा यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) परिसरात १०० खाटांचे माता बाल संगोपन केंद्राची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या करिता आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नातून शासनाकडून ३३.४० कोटींचा निधी मंजूर झाला असून येत्या मे २०२५ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. महिला व बाळांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या माता व बाल संगोपन केंद्राच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार तसेच महायुती सरकारचे आभार मानले आहे.

अमरावती जिल्ह्यात महिला व बालकांच्या आरोग्याला घेऊन अनेक उपाययोजना करण्यात येत असतांना धारणी-मेलघाट दुर्गम भाग, ग्रामीण क्षेत्र तसेच शहरी भागातील झोपटपट्टी क्षेत्र अशा ठिकाणी आजही कूपोषण,माता मृत्यू , बालमृत्यू सारखी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे महिलांचे प्रसूतीपूर्व तपासणी,लसीकरण, पोषण आहार, औषधी, कुटुंब कल्याण , बाळांचे आरोग्य अशा विविध बाबतीत चांगल्या सुविधा निर्माण करण्याला घेऊन आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी आरोग्य प्रशासनासोबत संवाद व समन्वय साधला. त्याअनुषंगाने आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी स्थानिक आरोग्य प्रशासनासोबत वारंवार बैठका घेऊन महिला व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दीर्घकालीन उपायोजना करण्याच्या सूचना केल्या. तसेच या संदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर निधी उपलब्धतेला घेउन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. याची फलश्रुती म्हणून आता जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन )परिसरात १०० खाटांचे माता बाल संगोपन केंद्राची नवीन इमारत बांधकामाकरिता शासनाकडून ३३.४० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तसेच येत्या मे २०२५ पासून माता व बाल संगोपण केंद्राच्या नूतन इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

बॉक्स :- महिला व बाळांना मिळणार आधार-आ.सौ. सुलभाताई खोडके

माता-बाल संगोपन कार्यक्रम हा कुटुंब कल्याण आणि आरोग्य क्षेत्रातील एक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून प्रसूती, औषध, आणि इतर साहित्याची व्यवस्था केली जाते. याशिवाय, बालकांच्या विकासासाठीही काही योजना राबवल्या जातात. या योजनेअंतर्गत अनाथ, निराधार, बेघर आणि शारीरिक व्यंग किंवा इतर आपत्ती असलेल्या बालकांना मासिक अनुदानही दिले जाते. संगोपनकेंद्राद्वारे गर्भवती महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी मदत व बाळाला आधार मिळणार आहे.

यातून प्रसूतीपूर्व काळात महिलांना त्यांच्या सध्याच्या आरोग्य स्थितीचे निरीक्षण व प्रसूतीनंतर पोषण आरोग्याच्या बाबतीत सुविधा मिळणार आहे. तसेच नवजात बालकास पुरविल्या जाणाऱ्या सर्व आरोग्यसेवांचे नियोजन करणे सोयीचे होईल. कुपोषणमुक्ती तसेच महिला-बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने चांगले काम करता येणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button