AmravatiLatest NewsSports

अमरावतीत ‘रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन’द्वारे कुष्ठरोग जनजागृती

अमरावती :- अमरावती जिल्ह्यात कुष्ठरोग जनजागृतीसाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 2025’ अंतर्गत ‘रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले. या विशेष मॅरेथॉनमध्ये जिल्ह्याच्या विविध भागांतून स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमाविषयी सविस्तर

पाहूया या खास रिपोर्टमध्ये….

अमरावती जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा स्टेडियम येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या उपस्थितीत ‘रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन’ला सुरुवात झाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले व सहाय्यक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग अमरावती डॉ. पूनम मोहोकार यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

सहाय्यक संचालक डॉ. पूनम मोहोकार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कुष्ठरोगाविषयी समाजात असलेल्या गैरसमजुती दूर करण्याच्या गरजेवर भर दिला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी उपस्थितांना कुष्ठरोग निर्मूलनाच्या उद्देशाने कार्य करण्याचे आवाहन केले.

मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष व स्त्री गटातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विजेत्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सहाय्यक संचालक डॉ. पूनम मोहोकार, गाडगे नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक केशव मालवे आणि जिल्हा लेखा व्यवस्थापक कोठारी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button