शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी समृद्धी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न!

नितीन देशमुखांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन; पोलिसांनी आंदोलकांना महामार्गावर जाण्यापूर्वीच रोखले
वाशिम | सिटी न्यूज
शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी तसेच विविध मागण्या मान्य कराव्यात, यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वनोजा-शेलुबाजार परिसरात हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनासाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने महामार्गाच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत आंदोलकांना महामार्गावर पोहोचण्यापूर्वीच रोखले.
पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट
आंदोलनादरम्यान काही कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला.
यावेळी आमदार नितीन देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीची मागणी
शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या विविध मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ताफा वाशिम जिल्ह्यात दाखल झाला होता. आंदोलनात अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे आंदोलकांना समृद्धी महामार्गावर रास्तारोको करता आला नाही.
आंदोलनस्थळी नेमके काय घडले आणि शेतकऱ्यांच्या मागण्या कोणत्या आहेत, याचा सविस्तर रिपोर्ट पाहा सिटी न्यूजवर.
सिटी न्यूजसाठी – गजानन राऊत, मेहकर, बुलढाणा



