AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

विलास नगरातील कपिल वस्तू नगरात घाणीचे साम्राज्य!

नागरिकांच्या तक्रारीची नगरसेवकांकडून दखल; स्वच्छतेसाठी महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश

अमरावती | सिटी न्यूज

अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक ६ अंतर्गत येणाऱ्या मोरबाग, विलास नगर आणि गवळीपुरा परिसरातील कपिल वस्तू नगर येथे अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. विलास नगर येथील नवीन कॉटन मार्केटच्या बाजूला असलेल्या या परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

२८ ऑक्टोबर २०२६ रोजी परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या प्रतिनिधीसमोर मांडत परिसराची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी केली.

नागरिकांच्या तक्रारीची दखल

कपिल वस्तू नगरातील अस्वच्छतेची बाब नगरसेवक दीपक सम्राट साहू, सौ. रेखा पंजाबराव तायडे, पंजाबराव तायडे आणि कौशिक अग्रवाल यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर संबंधित नगरसेवकांनी तातडीने महापालिका अधिकाऱ्यांना सूचना देऊन परिसरात स्वच्छता करण्याचे निर्देश दिले.

डास आणि रोगराई रोखण्यासाठी उपाययोजनांची मागणी

परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता करण्यात यावी, तसेच साचलेली घाण दूर करून डासांचा प्रादुर्भाव आणि संभाव्य रोगराई रोखण्यासाठी योग्य उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता या परिसरात यापुढे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आता महापालिका प्रशासनाकडून प्रत्यक्ष स्वच्छता मोहीम राबवून ही समस्या कायमस्वरूपी सोडवली जाते का, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सिटी न्यूज | अमरावती

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button