citynewsLatest NewsMaharashtraMaharashtra PoliticspoliticsPune

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत हर्षदा जाधव आघाडीवर!

हर्षदा जाधव यांना १ लाख ११ हजार २७९ मते; कोटा पूर्ण करण्यासाठी आणखी १,८१६ मतांची गरज

पुणे | सिटी न्यूज

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत हर्षदा जाधव यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना आतापर्यंत १ लाख ११ हजार २७९ मते मिळाली आहेत. तर स्मिता जाधव यांना १ लाख २ हजार ४२७ मते मिळाली आहेत. हर्षदा जाधव यांना विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण करण्यासाठी आणखी १ हजार ८१६ मतांची गरज असल्याची माहिती समोर आली आहे.

आतापर्यंत २१ उमेदवार बाद

मतमोजणी प्रक्रियेदरम्यान आतापर्यंत २१ उमेदवार बाद झाले आहेत. बाद फेऱ्यांनंतर दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी आणि मतांचे हस्तांतरण सुरू असून, पुढील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर उमेदवारांना मिळालेली मते

  • हर्षदा जाधव – १,११,२७९ मते
  • स्मिता जाधव – १,०२,४२७ मते
  • मोदी – ३,०६६ मते
  • सोमनाथ साळुंके – २,६३८ मते
  • नामदेव जाधव – १,९५५ मते
  • लक्ष्मण हरणावळ – १,४७२ मते

कोटा पूर्ण होणार का?

हर्षदा जाधव यांना कोटा पूर्ण करण्यासाठी आणखी १,८१६ मतांची आवश्यकता असल्याने पुढील मतमोजणी महत्त्वाची ठरणार आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निकालाचे चित्र स्पष्ट होईल.

सिटी न्यूज | पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button